बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हरिश्चंद्रानं उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला पण…- अतुल भातखळकर

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या भाजपला शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत. ते संजय राठोड प्रकरणात न्याय करणारच, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे.

हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात. ‘गब्रु’च्या बाबतीत प्रश्न सत्तेचा आहे एवढीच अडचण आहे, असं म्हणत भातखळकर यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्याबाबतही भाष्य केलं.

चित्रा वाघ ‘गब्रू प्रकरणी’ रोज सरकारची लाज काढत आहेत. कमाल आहे ठाकरे सरकारची, बलात्काऱ्यावर कारवाई करण्याची धमक नाही. आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. काय लायकीची माणसं आहे ही? म्हणे हे विचारी आणि सुसंस्कुत, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, पंतप्रधानांनी सांगितलं की आंदोलन करायचं नाही. मात्र महाराष्ट्रापर्यंत हा संदेश पोहोचलेला दिसत नाही. विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहेत. पण प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. भाजपवाले ज्या विषयासंदर्भात ते आंदोलन करू इच्छितात त्या विषयात मला खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत. ते या प्रकरणात नक्कीच न्याय करतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या –

रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दिपीकाच्या पर्सला हात आणि त्यानंतर…,पाहा व्हिडिओ

खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पठ्ठ्यानं पेट्रोल पंपावर भरलं डिझेल अन् केलं असं काही की…

6 महिन्यांच्या तीरा कामतला अखेर ‘ते’ 16 कोटींचं औषध मिळालं!

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More