कोल्हापूर महाराष्ट्र

“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”

कोल्हापूर | कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असं वक्तव्य केलं. सवदी यांच्या या वक्तव्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार समाचार घेतलाय.

तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

जोपर्यंत सूर्य, चंद्र असले तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही, अशी मुक्ताफळे सवदी यांनी उधळली. त्यांच्या या वक्तव्याचा हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

चंद्र-सूर्य कशाला, तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल, असा टोला हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”

“पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या आश्रयाला जातं”

तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी- एकनाथ खडसे

“हिंमत असेल तर भाजपने हेडगेवार आणि सावरकरांच्या नावाने मते मागून दाखवावीत”

भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या