Top News पुणे महाराष्ट्र

कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं मोठं वक्तव्य म्हणाले…

पुणे | कोरोनाची लस ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आलं असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

18 वर्षांखालील लहान मुलं, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राजेश टोपे यांनी  याविषयी माहिती दिली.

16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटमधून निघालेला कोरोना लसींचा साठा राज्यातील आठ प्रमुख डेपोंमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे.

त्यानंतर 15 तारखेच्या रात्रीपर्यंत या लसी ग्रामीण, जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होतील. त्यानंतर 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“ब्लॅकमेलशिवाय मुंडे आणखी काय बोलणार?, पण मी मरेपर्यंत लढेन”

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील- काँग्रेस

पहिल्या टप्प्यात 55 टक्के लाभार्थींना मिळणार लस!

मुंबईतील शाळा, कॉलेजची दारं जानेवारीच्या ‘या’ तारखेला होणार खुली???

“धनंजय मुंडे प्रकरणात सरकारवर कोणताही दबाव नसून मुंडेंवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या