बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याला पुढील 4-5 दिवस पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. त्यामुळे  दक्षिणेसह संपूर्ण राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

गणेशाचं आगमन होताच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची व त्याची पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेनं सरकण्याची शक्यता. पुढच्या 48 तासात, अजून तीव्र होण्याची शक्यता. याचा परीणामामुळे राज्यात येत्या 4,5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.

उत्तर मध्य महाराष्ट्रात कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येत्या काही तासांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसानं सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचं नुकसान झालेलं पहायला मिळत आहे. अनेक परिसरातील नद्यांच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

थोडक्यात बातम्या – 

अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी; अपघाताचा व्हिडीओ आला समोर

बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसलेला अटक!

‘…तर कोरोना पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

अंजली दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं, आम्ही आणखी उजळ माथ्याने समोर येऊ – छगन भुजबळ

गणपती बाप्पांचा पायगुण अन् या 8 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रूग्ण नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More