बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करु, म्हणणाऱ्या अण्णांची फडणवीसांच्या भेटीनंतर भूमिका बदलली”

सातारा | गेल्या कित्येक महिन्यांपासून राजधानी दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेक बैठका झाल्या मात्र यावर तोडगा निघाला नाही. देशभरात शेतकरी संघटनांच्या बाजूने उभे राहत अनेकांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला होता. तशाच प्रकारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आंदोलन काही झालं नाही. याच पार्श्वभूमीवर इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे.

अण्णा हजारे यांनी ‘शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आंदोलन करु’ असे सांगितलं होतं पण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी राळेगणसिद्धी येथे भेटुन गेले की अण्णा हजारेंनी भूमिका बदलल, असं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मते मांडली आणि अण्णा हजारे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

सध्या त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध काम करायचे नाही वाटतं. भाजपच्या काळात होणारा अफाट भ्रष्टाचारविरोधात आम्ही मैदानात उतरु. मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण प्रश्नाबाबत आमचा लढा सुरु राहिल, असंही हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली पात्रता ओळखून भाष्य करावे. तोंडाला येईल ते बोलून स्वतःचा पचका करून घेऊ नये. शरद पवार, अजित पवार यांच्यावर बोलताना त्यांची अनेकदा जीभ घसरली असल्याचं म्हणत पाटील यांनी पडळकरांना इशारा दिला.

थोडक्यात बातम्या- 

‘शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट’; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

एकीकडे आषाढी यात्रेवर निर्बंध अन् दुसरीकडे पंढरपुरात जयंत पाटलांच्या बैठकीत कोरोना नियमांचं उल्लंघन

“भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली असून इथे डाकू पण साधू होवू शकतो”

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 500 च्या खाली

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More