बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रुपाली चाकणकर… पहिली भेट या गावाला द्या”

मुंबई | कोरोना काळात लग्न समारंभावर निर्बंध लादण्यात आले होते. फक्त काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडले. याच कोरोना काळात महाराष्ट्रात बालविवाह वाढल्याचं पहायला मिळालं. अशातच आता कोरोना काळात बालविवाह झालेल्या मुलीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ही घटना सोशल मीडियावर मांडत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदुर येथे शेतात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील मुलगी तिचे वडील इतरांची गुरे राखण्याचे काम करतात. त्या मुलीचा मागील वर्षी बालविवाह लावण्यात आला. तिचे लग्न उस्मानाबाद तालुक्यातील उतमी कायापुर परिसरातल्या एका तरुणाशी लावण्यात आले. अल्पवयीन मुलगी असल्याने किमान तिच्यावर बाळांतपण लादू नये इतकाही विवेक त्या तरुणाला राहिला नाही मात्र, ती गरोदर राहून 14 ऑक्टोबरला तिला त्रास व्हायला लागला. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. मात्र, तिचा बाळंतपणा दरम्यान मृत्यू झाल्याचं हेरंब कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

बालविवाहामुळे कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण वाढते हे पुस्तकी वाक्य प्रत्यक्ष समोर बघताना अत्यंत वेदना होतात. स्त्री सक्षमीकरण वगैरे शब्द फोल वाटायला लागतात. 15 ऑक्टोबरला मृत्यू झाला. आज 9 दिवस झाले तरी गुन्हा का दाखल झाला नाही ? याचीच चौकशी करायला हवी, अशी मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

महिला आयोगाच्या नूतन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आता सर्वप्रथम पहिली भेट उस्मानाबाद जिल्ह्यातील या गावाला दिली पाहिजे. महिला आयोगाचा बालविवाह रोखणे हा अजेंडा व्हायला हवा आणि ते ह्या घटनेपासून व्हायला हवे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजाभवानीच्या शक्तीचा गौरव केला जातो त्याच जिल्ह्यातील अभागी भगिनी नवरात्र सुरू असतानाच मृत्युमुखी पडली आहे ही वेदना अस्वस्थ करते, असंही ते म्हणाले आहेत.

अजूनही या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले म्हणून थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करायला हवा आणि त्या बिचाऱ्या मुलीच्या मृत्यूबद्दल सासरचे आणि माहेरचे यांना जबाबदार धरून आरोपी करायला हवं. दयामाया न दाखवता कठोरपणे कारवाई व्हायला हवी तरच या कायद्याचा वचक बसू शकेल, असंही हेरंब कुलकर्णी म्हणाले.

पाहा पोस्ट-

थोडक्यात बातम्या-

“समीर वानखेडेंची नोकरी जातेय की, मलिकांचं मंत्रिपद जातंय ते पाहुया”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

“भारत पाकिस्तान सामना होणं हे राष्ट्रहिताच्या विरोधात”

‘क्रूझ पार्टीमध्ये राज्यातील ‘तो’ मंत्री सहभागी’; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More