बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलाम! आगीत हॉस्पिटल पेटलं तरी डॉक्टर करत राहिले रुग्णाची सर्जरी; पाहा व्हिडीओ

माॅस्कोे |  रुग्णसेवा हे आमचं प्रथम कर्तव्य आणि जबाबदारी असं व्रतच प्रत्येक डॉक्टर घेत असतो आणि ते पूर्ण करतानाही दिसतो. भले मग त्याच्या जीवावर बेतलं तरी रुग्णाच्या जीवासाठी तो धडपडत असतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे तो रशियातील. जिथं हॉस्पिटलला आग लागली तरी डॉक्टर रुग्णाची सर्जरी करत राहिले. स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती आणि ते त्यांनी केलंच.

मॉस्कोतील ब्लागोवेशचेंस्क शहरातील एका रुग्णालयात आग लागली. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागली. त्याचवेळी डॉक्टरांची एक टीम एका रुग्णाची शस्त्रक्रिया करत होते. या रुग्णाची ओपन हार्ट सर्जरी सुरू होती. आग लागली म्हटल्यावर रुग्णालयातील सर्वांची धावपळ सुरू झाली पण हे डॉक्टर काही आपल्या जागेवरून हलले नाहीत. कारण रुग्णाला त्यांनी तसंच सोडलं असतं किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला असता तर रुग्णाचा जीव गेला असता.

रुग्णाचं ऑपरेशन करणारे सर्जन वॅलेन्टिन फिलाटोव्ह यांनी आरईएन टीव्हीशी बोलताना सांगितलं, आम्ही आणखी काहीच करू शकत नव्हतो. आम्हाला कोणत्याही किमतीत या रुग्णाचा जीव वाचवायचा होता. आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने ते केलं. हे हृदयाचं ऑपरेशन होतं. रुग्णाला आम्ही असंच सोडू शकत नव्हतो.

दरम्यान, हे रुग्णालय 100 वर्षांपूर्वी 1907 साली बांधण्यात आलं होतं. त्याचं छप्पर लाकडाचं आहे, त्यामुळे आग पेटत गेली. रुग्णालयाच्या छतावर आग लागताच 128 लोकांना तात्काळ रुग्णालयाबाहेर काढण्यात आलं. यादरम्यान कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहितीही आपात्कालीन मंत्रालयाने दिली.

थोडक्यात बातम्या – 

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा! चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंंत्र्यांना टोला

‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे’; पुण्यातील मिनी लॉकडाऊनला भाजपचा कडाडून विरोध

रुग्णसंख्या वाढली, कोरोना बळीही वाढले, कोरोनाचा कहर; ‘या’ देशात संपूर्ण लाॅकडाऊन घोषित

“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More