Top News महाराष्ट्र मुंबई

“…फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली”

मुंबई | शेतकऱ्यांच्या आंदोलनास चीन आणि पाकिस्तानची फूस तर आहेच. पण त्यांच्याकडून अर्थपुरवठाही होत असल्याची फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली असल्याची खोचक टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणं समजून घ्या. त्यांच्या मागण्या मान्य करा असेच विरोधकांचं म्हणणं आहे. पण विरोधकांनी शेतकऱ्यांची बाजू घेणं म्हणजे अराजक माजविण्याचा प्रयत्न, असा नवा शोध सरकार पक्षाने लावला असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

दिल्लीत हिंदुस्थान बंदच्या आधी पाच दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. त्यातले तीन पंजाबचे तर दोन कश्मीरचे आहेत. यांचे संबंध खलिस्तानवाद्यांशी असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. आता गाडलेले खलिस्तानचे भूत पुन्हा उकरून काढलं जात असल्याचं अग्रलेखात सांगितलं आहे.

दरम्यान, कृषी सुधारणा कायदा म्हणत आहेत तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळा कायदा आहे. या काळ्या कायद्यास विरोध करणे म्हणजे देशात अराजक माजविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपचे पुढारी करतात, तेव्हा आश्चर्य वाटत असल्याचंही म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कृषी कायदे रद्द होणार की नाहीत यावर अमित शहांनी केला खुलासा; म्हणाले…

कोविड लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर- पंतप्रधान नरेंद्र मोदी

महादेव जानकरांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“डिसले गुरूजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांच्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली”

“महाविकास आघाडी सरकार कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावत एक चांगला निर्णय येईल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या