बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत”

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील 4 नेत्यांची वर्णी लागली. डाॅ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. दुसऱ्यांदा बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या सुपुत्री प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात सामील करून न घेतल्यानं मुंडे समर्थक नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

तीन दिवसांपुर्वी पंकजा मुंडे यांनी दिल्लीवारी केली होती. त्यांनी या अचानक केलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंंचावल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर त्यांनी डाॅ. भागवत कराड यांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भागवत कराड यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे.

12 जुलैला पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या होत्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळं झालं. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या, असं ट्विट भागवत कराड यांनी केलं आहे. काही दिवसांपुर्वी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, एकीकडे भाजपा नेत्यांकडून मुंडे भगिनी नाराज नसल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक मुंडे समर्थक भाजप पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्यानं अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. एकदोन नव्हे तर तब्बल 105 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

आता घरबसल्या करता येणार कोरोना चाचणी; अवघ्या 325 रुपयांत होणार चाचणी

सकारात्मक बातमी! ‘या’ राज्यात आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

भाजपला मोठा धक्का! आत्तापर्यंत 105 मुंडे समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET ची तारीख जाहीर; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 500 च्या खाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More