बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आईस्क्रीम की इडली ?’, शशी थरूर यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

नवी दिल्ली | अनेक व्यापारी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काही अनोख्या कल्पना वापरत असतात. त्यामुळे सध्या व्यावसायिक स्पर्धेत नवनवीन पदार्थ पहायला मिळातात. असच काहीसं कर्नाटकातील बंगळुरु येथे झालं आहे. येथील एका हाॅटेल चालकाने लढवलेल्या यु्क्तीने त्याला चर्चेत आणलं आहे. या बाबत स्वतः काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी ट्विट केली आहे.

बंगळुरु म्हणजेच कर्नाटक म्हणलं की विशेष इडली, डोसा, मेदू वडांचा नाष्टा आलाच. अशातच तेथील एका हाॅटेल चालकाने आईस्क्रीमच्या कांडीवर इडलीची सजावत केली. त्यातली एक इडली सांबरमध्ये देखील बुडवून दिली जाती. त्यामुळे या प्लेटला आणखीन शोभा येते.

या प्लेटचा फोटो शशी थरुर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना हास्यास्पद मात्र व्यावहारिक असं लिहलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी याला रिट्विट करत हाॅटेल चालकाची तसेच आचार्याची देखील स्तुती केली आहे.

दरम्यान, शशी थरूर अनेक मजेशिर ट्विट करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी त्यांच्या केलेल्या काही मिम्स देखील शेअर केल्या होत्या.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

“चंद्रकांत पाटलांनी 15 डिसेंबरची मुदत दिली होती, म्हणजे 6 महिने…”

प्रा. दत्तात्रय चव्हाण यांना अर्थशास्त्र विषयात Ph.D.पदवी

मान्सून हंगाम संपला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार परतीचा पाऊस

“मी अजूनही काँग्रेससोबतच, सध्या तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही”

…अन् 7 सेकंदात 7 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More