बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती”

मुंबई | राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात नेहमी शाब्दिक युद्ध पाहायला मिळतं. त्यांनी अनेकदा एकमेकांंवर खोचक टीका केल्या आहेत. आता पुन्हा निलेश राणे आणि गुलाबराव पाटील यांच्यात टोलवाटोलवी पाहायला मिळत आहे. निलेश राणे यांच्या टीकेला गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे, आता पालकमंत्री आहेत आणि सुपारीचोर आहेत, अशा शब्दात काही दिवसांपुर्वी निलेश राणे यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली होती.

‘राणेंनी वांद्रे येथे घर बांधले तेव्हा रेती मीच पाठवली होती आणि मी सुपारीचोर आहे तर त्यांच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती, हे त्यांनी आठवावे.’ अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझा वाळू चोरांशी संबंध असेल तर तो निलेश राणे यांनी सिद्ध करुन दाखवावा, असं आवाहन देखील त्यांनी निलेश राणे यांना दिलं आहे.

दरम्यान, ती व्यक्ती सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. आता गुलाबराव काय युनिव्हर्सिटी आणणार, ते वाळूच चोरणार. यातले सगळे कलेक्शन त्यांच्याकडे जात असणार, असं देखील निलेश राणे म्हणाले होते. गुलाबरावांच्या टीकेला आता निलेश राणे काय उत्तर देतील याकडे रत्नागिरीकरांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लसीकरणासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली; लस वाया घालवणाऱ्या राज्यांना दणका!

‘अजित पवार यांचा गजनी झालाय का?’; भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याची अजित पवारांवर टीका

‘या’ शहरातील व्यापारी लॉकडाऊनविरोधात आक्रमक; आज जीवनावश्यक वस्तूंची दुकानं राहणार बंद

सकारात्मक बातमी! ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या आली 100च्या खाली

फ्रान्समध्ये नागरिकानं चक्क राष्ट्राध्यक्षाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More