बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझे पोलीस माफिया असतील तर यूपीचे पोलीस भारतभूषण आहेत का?”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबई मधील ष्णमुखनंद सभागृहात पार पडला. राज्यातील मागील काही घटनांचा विचार केला तर महाराष्ट्रातील पोलिसांची खुप बदनामी झाल्याचं दिसून आलं. यावरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांवरून विरोधक सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत आहेत. माझे पोलीस माफिया असतील तर यूपीचे पोलीस भारत भूषण आहेत का? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी लखीमपूर, प्रियांका अटक, अखिलेश यादवांच्या घरापुढे पोलीसांचा मोठा पहारा यांचा संदर्भ ठाकरेंनी दिलाय.

दरम्यान, आरएसएसचे आणि आमचे विचार एक आहेत. मोहन भागवतांचे विचार त्यांनी म्हटलंय हिंदुत्व म्हणजे सर्वांचे पूर्वज एक होते हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज परग्रहावरुन आले होते का? आपण मेळाव्यात विचार मांडतो ते पाळणार नसेल तर दसरा मेळाव्यांची काय गरज, असा सवाल मोहन भागवतांना उद्धव ठाकरेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्रात लोकशाही खून तर यूपीत काय लोकशाहीचा मळा फुलला आहे का?”

“जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात”

“शब्द जपून वापरतोय नाहीतर फाडायला काही वेळ लागत नाही”

“सावरकर-गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही”

“गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज सापडलं त्यावर का बोलत नाहीत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More