बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका

नवी दिल्ली | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैय्या कुमारने काँग्रेस नते आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच यावेळी गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोघांंच्या पक्षांतरानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी देखील कन्हैय्या कुमारच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. जर कोणी गटारातून बाहेर पडून नाल्यात पडत असेल तर आपण त्याबद्दल फक्त सहानभूती व्यक्त करु शकतो, असंं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील भवानीपूर येथे ते बोलत होते.

तसेच सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनी देखील कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. कन्हैय्या यांनी स्वत:ला माझ्या पक्षातून बाहेर काढले. सीपीआय नेहमीच जातीहीन आणि वर्गहीन समाजासाठी लढत आला आहे.

त्यांच्या काही वैयक्तिक महत्वकांक्षा आणि ध्येय नक्कीच असतील. कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारसरणीवर विश्वास नसल्याचे पक्षांतरावरुन दिसून येते, अशी टीका डी राजा यांनी केली आहे. दरम्यान, कन्हैय्या कुमारचा काॅंग्रेसमधील प्रवेश पक्षासाठी महत्वाचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्रावर…’; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

“गोवा ड्रग्ज माफियांच्या ताब्यात अडकला आहे, तिकडे जाणं गरजेचं”

“शेतकरी उद्धवस्त, उभी पीकं पाण्याखाली, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”

धक्कादायक! ठाण्यातील नर्सने कोरोनाऐवजी दिली रेबिजची लस अन् मग…

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More