कोल्हापूर | मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कोल्हापूरातील दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिय्या आंदोलनात काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी सहभाग नोंदवून मराठा बांधवाशी संवाद साधला.
ज्याच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तो मराठा कधीच आत्महत्या करणार नाही. तुम्हाला गाडायचेच असेल तर गद्दारांना गाडा, असं आवाहन त्यांनी यावेळी मोर्चेकऱ्यांना केलं.
दरम्यान, मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार नोव्हेंबरची वाट कशाला बघते ? आरक्षण द्यायचे असेल तर आताच द्या. अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या बातम्या–
-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला
-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!
-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”
-…म्हणून 9 ऑगस्टला मुंबईत मराठा आंदोलन होणार नाही
-वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न