बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“यापुढे त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी  लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्य त्रास देत असल्याचं सांगितलं. काही चुक नसताना त्रास होत असल्यानं आत्महत्या करायचं ठरवलं आहे, असं त्यांनी त्यांच्या शेवटच्या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

यापुढे कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकीच आहे, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही, असंही अमेय खोपकर म्हणाले.

राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

दरम्यान, मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. त्यामुळं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असं कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्येपुर्वी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध, म्हणाले…

सैराट फ्रेम तानाजीनं केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर तुफान चर्चा

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट; 15 वर्षांचा संसार मोडला

समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; आग विझवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; महापौरांनी दिली ही महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More