बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी इतकी व्यस्त आहे की मला बोअर व्हायलाही वेळ मिळत नाही”

नवी दिल्ली | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा केवळ बाॅलिवूडच नाही तर हाॅलिवूड सेलिब्रेटी देखील आहे. तिने काही वर्षांपुर्वी अमेरिकन गायक निक जोनससोबत लग्न गाठ बांधली आहे. अशातच प्रियांकाने तिला बोर होण्यासाठी देखील वेळ नसल्याचं सांगितलं आहे.

एका मुलाखती दरम्यान प्रियांकाला विचारण्यात आलं होतं की तुला एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात जसे की शूटिंग, व्लॉगिंग आणि वारंवार ड्रेस बदलणे, तसेच मेकअप इत्यादी. तर तुला या रूटीनचा कंटाळा किंवा बोअर नाही होत का?. या प्रश्नावर उत्तर देत मी तयार होण्यास फक्त 45 मिनिटे घालवते, असं प्रियांकाने सांगितलं.

माझी टीम केसांपासून मेकअपपर्यंत सर्व काम करत असल्याचं प्रियांकाने सांगितलं आहे. तसेच दिवसभर एकाचवेळी इतकी कामे करते आणि मी इतकी व्यस्त आहे की मला बोअर व्हायलाही वेळ मिळत नाही, असं देखील तिने यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, लग्नानंतर प्रियांकाने लॉस एंजेलिसमध्ये नवं घर खरेदी केलं आणि ती तिकडे शिफ्ट झालीये. प्रियांका सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीच ती इन्स्टाग्रामच्या रिच लिस्टमध्ये झळकली आहे.

थोडक्यात बातम्या-

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत- बाळासाहेब थोरात

“देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता”

मंगलकार्यालयात बॉयफ्रेंडचं लग्न सुरु, बाबू- बाबू म्हणत गर्लफ्रेंडचा गेटवर आक्रोश

‘रोज एक कॉफी प्यायल्यास…’; संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

“राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारण पूर्ण होत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More