बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पूराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी केंद्राकडून 701 कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली | महाराष्ट्रात पावसाने गेल्या चार-पाच दिवसांपुर्वी हाहाकार माजवला होता. महाराष्ट्रातील बऱ्याच भागाची मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्यानं जीवित तसेच वित्तहाणी झाली आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नुकसानग्रस्त भागासाठी मदत मिळत आहे. अशातच आता केंद्र सरकारने देखील पूराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पूराचा फटका बसला आहे त्या शेतकऱ्यांसाठी 701 कोटी रुपयांची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान ही मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी सातत्याने पाऊस चालू आहे. सलग चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना महापूर आला आहे. यामुळे कित्येक गावे पूराच्या पाण्याखाली गेली आहेत.

तसेच दरड कोसळल्याने गावच्या गावं जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची ही मदत आता मोलाची ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

त्वचेच्या सर्व समस्यांसाठी नारळ तेल आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे!

मोठी बातमी! ‘या’ कारणाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या तारखेत बदल

‘भयंकर आडाणी आलिया’,…म्हणून आलिया भट्ट होत आहे ट्रोल

‘वाढदिवसानिमित्त काय भेट देणार?’; भास्कर जाधव म्हणाले, ‘स्वच्छ सुंदर चिपळूण’

चार दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More