बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

CBSE माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

नवी दिल्ली | सीबीएसई माध्यमातून शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे अनेक परदेशात राहणारे भारतीय कुटूंब भारतात परतत आहेत. त्यासाठी त्यांच्या मुलांना भारतात शिक्षणासाठी ते सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत.

नियमानुसार सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना सीबीएसई बोर्डाची पुर्वपरवानगी घेणं बंधनकारक होतं. त्यातच आता या नियमात बदल करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय बोर्डाने घेतला आहे. सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बोर्डाच्या पुर्वपरवानगीची गरज असणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सीबीएसईकडून एक परिपत्रक जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील निर्णय हा पालक व विद्यार्थी हित लक्षात घेऊन घेण्यात आल्याचं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांचीही गैरसोय होणार नाही.

परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता समानतेच्या आधारावरच सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचा मोठा निर्णय आज घेण्यात आला आहे. शिवाय पालकांसह विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

मुंबईत परतल्यानंतर परमबीर सिंहांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले…

माझ्या पराभवामागे ‘या’ नेत्याचा हात; मोठं षडयंत्र रचुन मला पाडलं

“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

“…तोपर्यंत दाढीतून घरं पडत राहतील, मोदींची दाढी आणि पीएम आवास दोन्ही अमर आहेत”

आता पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार, सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More