बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इम्रान खानवर स्वत:च्याच देशात चोरी करण्याची आली वेळ?

नवी दिल्ली | पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय खराब चाललेली असून पाकिस्तानवर सध्या कर्जाचा डोंगर झाला आहे. अशा दयनीय अवस्थेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना भेट म्हणून मिळालेले एक घड्याळ विकले आहे. मात्र त्यांनी हे घड्याळ विकून त्याचे पैेसे देशाच्या तिजोरीत जमा केले नाहीत, तर त्यांनी ते पैसे स्वत:कडेच ठेवले आहेत. त्यांच्या या कृत्यावर सध्या सर्वच क्षेत्रातून टिका केली जातेय.

पाकिस्तानची परिस्थिती बिघडलेली असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मात्र स्वत:चेच घर भरण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे. इम्रान खान यांना आखाती देशाच्या राजकुमाराकडून  दहा लाख अमेरिकन डॉलर किमतीचे घड्याळ  भेट म्हणून मिळाले होते. ते इम्रान खान यांनी त्यांच्या दुबईतल्या एका मित्राला 10 लाख रुपयांना विकले आहे. शिवाय ते पैसे त्यांनी सरकारी तिजोरीत जमा करण्याऐवजी स्वत: कडेच ठेवून घेतले.

राष्ट्रप्रमुख आणि इतर घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींना इतर राष्ट्रप्रमुख किंवा नामांकित व्यक्ती भेटवस्तू देत असतात. परंतु त्या भेटवस्तूवर हक्क केवळ ज्या त्या देशाच्या सरकारचा असतो. पाकिस्तानमध्येही हाच नियम आहे. जोपर्यत त्या भेटवस्तूचा अधिकृतरित्या लिलाव होत नाही. तोपर्यंत त्यावर केवळ सरकारचा अधिकार असतो. असं असतानाही इम्रान खान यांनी परवानगीशिवाय घड्याळ तर विकलंच. शिवाय त्यांनी मिळालेले पैसे सरकारच्या तिजोरीत जमा करण्याऐवजी स्वत:कडेच ठेवून घेतले.

इम्रान खान यांच्या कृत्यानंतर आता विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियज नवाज यांनी यासंदर्भात ट्विट करून टिका केली आहे. त्या म्हणाल्या कोणी आपल्याच देशाच्या  तिजोरीतील भेटवस्तू कशा काय चोरू शकतं?, तर दुसरीकडे पाकिस्तान डेमोक्रेटीक मुव्हमेंटचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनीही इम्रान खान यांच्यावर सणकून टीका केली आहे. यावेळी इम्रान खान यांनी घड्याळ विकल्याचं स्वत: प्रिन्सलाही माहिती नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं’, धनंजय मुंडेंनी सांगितली मन की बात

“शिवसेना सोडणाऱ्यांच्या यादीत पहिलं नाव रामदास कदम यांचं होतं”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘तो’ 500 कोटींचा घोटाळा सोमय्यांनी उघड करावा; संजय राऊतांच्या पत्राने राज्यात खळबळ

“कलम 370 रद्द करून फार मोठी चूक केली, त्याचा परिणाम आता भोगावा लागतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More