बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Pakistan Political Crisis | इम्रान खानचं सरकार पडलं, पंतप्रधान पदावरून अखेर हकालपट्टी

इस्लामाबाद | जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये विविध घटना घडत आहेत. अशात सर्व जगाचं लक्ष पाकिस्तानमधील (Pakistan) राजकीय गोंधळाकडं लागलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना आपल्या पदाचा राजीनामा (Resigned) द्यावा लागणार आहे.

पाकिस्तान नॅशनल असेब्लीत इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. परिणामी त्यांचं सरकार अल्पमतात आल्यानं कोसळलं आहे. अशात आता इम्रान खान यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची चर्चा आहे.

गेल्या जवळपास महिनाभरापासून पाकिस्तानमध्ये जोरदार राजकारण रंगलं होतं. इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांच्या एका गटानं अचानकपणे त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. मग रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत इम्रान यांनी धावपळ केली पण शेवटी प्रयत्न फोल ठरले आहेत.

दरम्यान, मी क्रिकेटर आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहाणार म्हणणाऱ्या इम्रान यांना शेवटी क्लिन बोल्ड व्हावं लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोल्हापूरचा गडी सगळ्यावर भारी! पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

“सुरक्षेत चुक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार”

“शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या म्हणून…”

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी

“शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागं संजय राऊतांचा हात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More