बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फ्रान्समध्ये नागरिकानं चक्क राष्ट्राध्यक्षाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ तुफान व्हायरल

पॅरिस | गेल्या वर्षी इस्लामवर वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तीनं कानशिलात लगावली आहे. ते दक्षिण फ्रान्समध्ये आज दौऱ्यावर असताना हा प्रसंग घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मंगळवारी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सच्या उत्तर-पश्चिम भागांच्या दौर्‍यावर गेले होते. यावेळी एका व्यक्तीने थेट राष्ट्राध्यक्षांच्या कानशिलात लगावली. मॅक्रॉनला यांना लगावलेली चापट इतकी जोरदार होती की ते काही पावले मागे सरकले. राष्ट्राध्यक्षांना चापट मारताच “डाउन विथ मॅक्रॉन-इझम” हे शब्द मोठ्यानं उच्चारले गेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

चापट मारल्यानंतर जवळपास उभे असलेले लोकं जोरात ओरडले. त्याचवेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन जणांना अटक केली आहे. फ्रेंच पोलिसांचे म्हणणे आहे की, पोलीस या दोघांची चौकशी करत आहेत आणि हल्ल्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यातही याच मासिकात असंच एक पत्र प्रकाशित झालं होतं. ज्यामध्ये गृहयुद्धाचा इशारा देण्यात आला होता. नंतर फ्रान्सचे गृहराज्यमंत्री आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे निकटवर्तीय जेराल्ड डॅरमिनिन यांनी या पत्राला काहीजणांचे अपरिपक्व आणि बालिश डावपेच असल्याचं म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या – 

“पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

“ठाकरे सरकारने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील गरिबांना मदत करावी”

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

कोरोना सेंटरमध्ये साप घुसल्यानं उडाली खळबळ, अन्….

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?; एम्सच्या संचालकांनी दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More