Top News मनोरंजन

“हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र, सूर्याइतकीच लख्ख आहे”

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने बॉलिवूडमधील घराणेशाहीविरूद्ध आवाज उठवला त्याबद्दल तुमचं मत काय आहे, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना एबीपी माझाच्या माझा कट्यावर विचारण्यात आला होता. यावर मातोंडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

1990 च्या दशकात 15 ते 16 अभिनेत्रींनी माझ्यासोबत आल्या होत्या. त्यातल्या 11 ते 12 अभिनेत्री या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या. त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटेझिम हे आज आलेलं नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे. हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्याइतकीच लख्ख असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला सुरूवातीला बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरण्यात आलं होतं. त्यावेळी अभिनेत्री कंगणा राणावतने त्यावेळी थेट घराणेशाहीवर आरोप केले होते.

दरम्यान, मराठी असल्याचा मी त्रास सहन केला आहे, मी अनेक गोष्टी भोगल्या आहेत. मी त्यावेळी नेपोटिझमबद्दल बोलले नाही. मात्र आत्ता मी या सगळ्या गोष्टी बोलत असल्याचं मातोंडकर यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री असते तर…- कंगणा राणावत

कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- दादा भुसे

‘आमचं वेतन घ्या पण…’; खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली ही विनंती

“संपूर्ण देश सैन्यासोबत उभा आहे, तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार?”

“राजभवनाचं सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून नामकरण करावं का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या