बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे आणि पवारांच्या बैठकीत ‘या’ महत्वपूर्ण मुद्यांवर झाली चर्चा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली आहे. या बैठकीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. अनेक महत्वपूर्ण गोष्टींवर बैठकीत चर्चा पार पडली आहे.

या बैठकीत अवजड वाहनांवरील वाहतूक कर कमी करण्याबाबत चर्चा पार पडली. तसेच कोरोनामुळे आणि डिझेलच्या दरवाढीमुळे अडचणीत सापडलेल्या वाहतूकदारांना दिलासा देण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा पार पडली आहे.

याबरोबरच हायवेवरील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजणा, ट्रक आणि इतर अवजड वाहनांसाठी पार्किंग टर्मिनल, तसेच हॉटेल्स, नाट्यगृह, सिनेमागृह, मॉल्स यांच्यासाठी असलेले निर्बंध शिथील करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा पार पडली आहे.

दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलिस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या –

“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे”

ग्राहकांची प्रतिक्षा संपली! टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV आली बाजारात

कोरोना लस टोचायला आलात तर खबरदार, अंगावर साप सोडण्याची दिली धमकी

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

T-20 विश्वचषकापुर्वीची ‘ती’ एक चूक अन् पाकिस्तानला मागावी लागली बीसीसीआयची माफी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More