बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शब्दालय प्रकाशनच्या ‘पुस्तकवारी’ पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

श्रीरामपूर | बहुप्रतिक्षित शब्दालय प्रकाशनच्या पुस्तकवारी पुस्तक दालनाचे उद्घाटन आमदार लहू कानडे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. तसेच शब्दालय पुस्तकवारी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी शब्दालय प्रकाशनच्या संस्थापिका सुमती लांडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलीस अधिक्षक दिपाली काळे, ज्येष्ठ लेखक नामदेवराव देसाई, मराठी साहित्यिक संतोष खेडलेकर, डॉ. प्रमोद काळे, सुमीत लांडे, मृण्मयी लांडे आदी उपस्थित होते.

वाचकांसाठी शब्दालय प्रकाशनाने ‘पुस्तकवारी पुस्तक दालन’ हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. या दालनामध्ये शब्दालय प्रकाशनाच्या पुस्तकांबरोबरच इतरही प्रकाशनाची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच यावेळी पुस्तकवारी या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनामध्ये पुस्तकांवरती 50 टक्क्यांपर्यंत सवलत देखील देण्यात येत आहे.

सदर प्रदर्शन महिनाभर सुरु ठेवण्यात येणार आहे. वाचकांनी आणि रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सुमती लांडे यांनी केलं आहे. यावेळी लेखक नामदेवराव देसाई यांचे शब्दालय प्रकाशनचे पहिले पुस्तक ‘पंचनामा’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अविनाश आदिक यांच्या हस्ते करण्यात आलं.

आमदार लहू कानडे यांनी शब्दालयच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. शब्दालयने साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा निर्माण केला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 25 पेक्षा अधिक पारितोषिके मिळवत आज 700 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. सुमती ताईंनी 1980 च्या दशकात एक वृक्ष लावला होता, तो आज मोठा वटवृक्ष झाला आहे, असंही लहू कानडे यांनी म्हटलं आहे.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी शब्दालय प्रकाशनला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयात जास्तीत जास्त प्रचार करून पुस्तके वाचण्याचा छंद निर्माण करावा, असं आवाहन केलंय. तर सुमतीताईंनी त्यांना साहित्य निर्मितीची प्रेरणा दिली. माझे पहिले पुस्तक ‘च्यामारी’ हे शब्दालय प्रकाशननेच प्रकाशित केलं, असं डॉ. प्रमोद काळे म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी सारंगधर निर्मळ, विजया निर्मळ, प्रा. ताई पवार, बाबुराव उपाध्ये, निमा पाटील, प्रा. गुंफा कोकाटे, प्रा. संगिता फासाटे, डॉ. वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, पत्रकार अजिंक्य कुलकर्णी, प्रकाश कुलथे, अनिल पांडे,  राजेंद्र बोरसे,  प्रदिप आहेर,  करण नवले, रवी भागवत, महेश माळवे,  नवनाथ कुताळ,  देवीदास देसाई,  अमोल महाले, सचिन डंबीर, रामचंद्र राऊत, रितेश रोटे, अमोल रोटे, प्रशांत देशमुख, निलेश बोरावके आदी मान्यवर उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

‘आमची सत्ता आली तर…’; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री?; थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता

“चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता”

भाजप नेते किरीट सोमय्या स्थानबद्ध???; देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने खळबळ

‘डाॅल्फिनने माझ्यासोबत सेक्स केला अन् …’, महिलेने केला अजब खुलासा

…म्हणून अंबिका सोनींनी नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More