बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; मानहानीच्या खटल्यानंतर आणखी एक तक्रार दाखल

मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानप्रकरणी अनेक आरोप होत आहेत. वानखेडेंवर रोज नवीन आरोप करणारे महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे आता कायदेशीर वादात सापडले आहेत.

नवाब मलिकांच्या विरोधात समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याचं उत्तर नवाब मलिकांनी मंगळवारपर्यंत देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या विरोधात एसी-एसटी कायद्याअंतर्गत तक्रार केली आहे. याबाबत एफआयआर नोंदवण्याची मागणीही त्यांना केली आहे.

समीर वानखेडेंच्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर सुनवाई झाली. नवाब मलिकांचे वकील अॅड. अतुल दामले यांनी उच्च न्यायालयाकडे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. याचिकाकर्ते सज्ञान मुलाच्या वतीने बोलू शकत नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. समाजमाध्यमांवर होत असलेल्या इतरांच्या चर्चेला नवाब मलिकांना जबाबदार धरता येणार नाही, असा दावाही दामलेंनी यावेळी केला.

दरम्यान, समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या विरोधात 1.25 कोटींचा अब्रुनूकसानीचा दावा केला आहे. आमच्या कुटुंबाच्या विरोधात प्रसारित झालेला सर्व मजकूर समाजमाध्यमांवरुन, प्रसारमाध्यमांवरून हटवण्याची मागणी समीर वानखेडेंच्या वडिलांनी यावेळी केलीये. नवाब मलिकांना आमच्या कुटुंबाविरोधात लिहिण्यास, वक्तव्य करण्यास कायमस्वरूपी मज्जाव करण्यात यावा अशीही मागणी ज्ञानदेव वानखेडेंनी केली आहे. ज्ञानदेव यांच्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी आज नवाब मलिक उत्तर दाखल करणार असुन याची सुनवाई उद्या होणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘तुम्ही ट्विटरवर उत्तर देता ना, तर मग इकडेही द्या’; न्यायालयाने नवाब मलिकांना फटकारलं

“भाजपमध्ये घराणेशाही नसेल, पण पक्ष व्यक्तिकेंद्रित झालाय”

“…तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही, कारवाई करेल”

SIT चौकशी दरम्यान किरण गोसावी संबंधी धक्कादायक माहिती आली समोर!

मोठी बातमी! दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More