हाँगकाँगने भारताचा जीव काढला; पराभूत होऊनही जिंकली मनं

दुबई | आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत भारतीय क्रिकेट संघाचा अक्षरशः जीव निघालेला पहायला मिळाला. नवख्या हाँगकाँग संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी क्रिकेटरसिकांची मनं जिंकली.

भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 285 धावा करता आल्या. यामध्ये शिखर धवनच्या शतकाचा (127 धावा) समावेश होता. 

हाँगकाँगच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांच्या नाकात दम आणला. निजाकत खान आणि कर्णधार अंशुमन राठने पहिल्या 30 षटकात भारताला एकही विकेट मिळू दिली नाही. अखेर सलामीची जोडी बाद झाल्यानंतर हाँगकाँगचे गडी क्रमाक्रमाने बाद होत गेले. 50 षटकात हाँगकाँगला 8 गडी गमावून 259 धावा करता आल्या. अवघ्या 26 धावांनी भारताला विजय मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या-

-आगामी निवडणुकीत मनसे कुणासोबत जाणार?; पाहा काय म्हणाले संदीप देशपांडे…

-माजी महिला राज्यमंत्र्याला सासरच्यांकडून जाळून मारण्याचा प्रयत्न!

-लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांना आमदार नितेश राणेंचा पाठिंबा

आता मोदी सरकारची लाज वाटतेय; राहुल गांधींचा हल्लाबोल

-शिवसेनेच्या मदतीमुळेच जळगाव महापालिकेत भाजपच्या महापौर