नवी दिल्ली | भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिला क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते मंगळवारी ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं आहे.
जवाहरलाला नेहरु स्टेडियममध्ये असलेल्या क्रीड प्राधिकरणाच्या मुख्यालयात रिजीजू यांच्या हस्ते स्मृती मंधाना हिला हा पुरस्कार देण्यात आला. स्मृतीसह टेनिसपटू रोहन बोपन्नालाही 2018 चा अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2018 चे वितरण करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी स्मृती श्रीलंकेत क्रिकेट सामने सुरू असल्याने उपस्थित राहू शकली नव्हती.
दरम्यान, स्मृती मंधानाने 55 एकदिवसीय सामन्यात 1951 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-