नवी दिल्ली | भारतीय क्रिडा क्षेत्रात महिला आपल्या भरीव कामगिरीनं देशाचा मान वाढवत आहेत. आशियाई कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. अंशु मलिक आणि राधिका यांनी 57 आणि 65 वजन गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे.
कुस्तीपटू मनिषानं कांस्यपदकाची कमाई केली. संपुर्ण स्पर्धेत अंशु मलिकनं आपल्या चमकदार खेळानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. परिणामी मलिकच्या खेळाची सर्वत्र चर्चा होत आहे. गतवर्षीच्या स्पर्धेत अंशु मलिकनं सुवर्णपदकाची कमाई केली होती. पण यावेळी ती तिच्याच गतवर्षीच्या कामगिरीप्रमाणं खेळ दाखवू शकली नाही.
मनिषानं या स्पर्धेत सलग तीन विजय प्राप्त करत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. जपानच्या मिया मोरीकावासोबतच्या मॅचमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला. याअगोदर स्पर्धेत सरिता मोर आणि सुषमा शौकिननं कांस्यपदकाची कमाई केली होती. परिणामी भारताच्या दृष्टीनं ही स्पर्धा चांगली गेली आहे.
दरम्यान, शनिवारी टोकियो ऑलिम्पिक रवि कुमार दहिया आणि बजरंग पुनिया स्पर्धेत आपले सामने खेळणार आहेत. परिणामी भारतीय चाहत्यांना त्यांच्याकडून देखील पदकाची अपेक्षा आहे.
थोडक्यात बातम्या –
पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला
“बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर…”; शरद पवारांनी कान टोचले
“…अन् प्रसाद ओक यांना पाहताच एकनाथ शिंदे पाया पडले”; पाहा व्हिडीओ
भल्या भल्यांची दात तोडणाऱ्या टायसननं भर विमानात प्रवाशाला धु-धु धुतला; पाहा व्हिडीओ
“मी भ्रष्टाचार केला असेल तर फक्त…”, मंत्री हसन मुश्रीफांचं खुलं आव्हान
Comments are closed.