फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला पदावरुन हटवण्याची मागणी

वाॅशिंग्टन | फेसबुकचे संस्थापक आणि चेअरमन मार्क झुकेरबर्ग यांना पदावरुन हटवण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. काही दिवसांपासून गुंतवणूकदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.

सततची होणारी टीका रोखण्यासाठी झुकेरबर्ग यांनी जनसंपर्क यंत्रणा सुरू केल्याची बातमी आली होती. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांंच्यावर नाराज होते. त्यामुळेच त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली गेली आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीत झालेला हस्तक्षेप आणि केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणी झालेल्या टीकेला रोखण्यासाठी फेसबुकने डिफायनर्स पब्लिक अफेयर्स या कंपनीची मदत घेतली होती.

दरम्यान, फेसबुकने नेहमीच आपले प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांची गळचेपी केल्याचा आरोप ‘न्यूयाॅर्क टाईम्स’च्या अहवालातून करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात 15 ते 20 मिनिटं खलबतं!

-गाडीवर जात लिहिणाऱ्यांनो, तुमची आता खैर नाही!

-गत विजयी आॅस्ट्रेलियाला लोळवलं; भारतीय महिलांचा पराक्रम

-मराठा आरक्षणासाठी सरकारने वकिलांची मोठी फौज तयार केेलीय -चंद्रकांत पाटील

-दुष्काळ जाहीर केला पण उपाययोजना कोण करणार?; धनजंय मुंडेंचा सवाल!