बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स बजावूनही त्यांनी चौकशीला हजर न राहता चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याच प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईवर आता काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका केली आहे. कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भाजपमध्ये धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा, असं देखील ते यावेळी म्हणाले.

मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून काढलेल्या 32 ते 35 लाख कोटी रुपयांचे कर्जाचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी छापे टाकले आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या विरूद्ध देखील ईडीने कारवाई करण्यास सुरवात केलीय. त्यामुळे केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतंय असा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार करण्यात येतोय.

थोडक्यात बातम्या-

“लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत”

गब्बर सेनेकडून लंकादहन; 7 गडी राखून भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

‘…तेव्हा वडिलांच्या औषधांसाठीही पैसे नव्हते’; वडिलांच्या आठवणीत नाना भावूक

“जास्त आगाऊपणा करू नका, जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला”

“शरद पवारांनी एनडीएत यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More