IPS रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ
मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब टाकल्यानंतर नवाब मलिक यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढले आहे. रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या वेळी भाजप विरोधकांचे फोन टॅप केले होते. त्या भाजपच्या एजंट आहेत. त्यांना लोकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याची सवय लागली होती. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारने शिक्षा म्हणून त्यांना थेट बढती न देता त्यांच्यासाठी वेगळ्या पदाची निर्मिती केली, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनीही केला आहे. फोन टॅपिंगची कार्यवाही ही पोलीस महासंचालक आणि मुख्य अतिरिक्त सचिवांच्या परवानगीनंतर झाली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. तसंच आपल्याकडे फोन टॅपिंगचा 6.3 जीबीचा डेटा असल्याचंही ते म्हणाले आहेत.
परवानगी शिवाय फोन टॅप करणं हा गुन्हा आहे. पोलीस बदल्यांच्या रॅकेटवेळी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी घेऊन फोन टॅप करण्यात आले होते, असं देवेंद्र फडणवीस सांगतात. मात्र, गृहमंत्रालयाची अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. देवेंद्र फडणवीस हे खोटी माहिती देऊन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. ते आज ज्या पद्धतीने रश्मी शुक्ला यांची बाजू घेत होते त्यावरुन फडणवीसांचा खोटेपणा उघड झाला आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तर खोट्या रिपोर्टच्या आधारे फडणवीस कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना मोठा झटका!
लेकीने वडिलांना हॉटेलमध्ये दारु पाजली, जेवू घातलं अन् नंतर जाळून टाकलं; कारण ऐकून पोलिसही हादरले
महाराष्ट्रातील घडामोडींमुळे काँग्रेस नाहक बदनाम; हायकमांड घेणार निर्णय!
सचिन वाझेंनी वापरलेली आणखी एक महागडी गाडी जप्त, ‘या’ कारणामुळे ही गाडी महत्त्वाची?
…म्हणून पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी क्षमा मागितली!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.