बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून ईशानने पहिल्याच चेंडूवर ठोकला षटकार’; ईशानच्या सिक्सरचं ड्रेसिंग रूम कनेक्शन

मुंबई | श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 80 चेंडू आणि सात विकेट्सने श्रीलंकेचा पराभव केला. या सामन्याममध्ये गोलंदाजांनी केलेल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेला 262 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर फलंदाजांनी केलेल्या तुफानी खेळीमुळे भारताने सहज विजय मिळवला. या सामन्यामधील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे ईशान किशनने पहिल्याच चेंडूवर मारलेला सिक्सर.

ईशानने आपला पहिला सामना असताना पहिल्याच चेंडूवर षटकार खेचल्याने सुरूवातीला अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र सामन्यानंतर फीरकीपटू युजवेंद्र चहलने किशनच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये यामागची खरी गोष्ट समजली. किशनने त्यामध्ये सांगितलं की, मी ठरवूनच आलो होतो ती कोणीही गोलंदाज असो पहिल्या चेंडूवर सिक्स ठोकायचा, त्याच इराद्याने मी पहिल्या चेंडूवर सिक्सर खेचल्याचं ईशान किशन म्हणाला.

फिल्डिंग करताना मला खेळपट्टीचा अंदाज आला होता. कारण खेळपट्टीवर गोलंदाजांना कमी मदत मिळत होती. त्यामुळे मी पहिल्या चेंडूवर सिक्स मारण्याच्या इराद्यानो उतरलो होतो. मी याबाबत माझ्या संघसहकाऱ्यांना याची कल्पना दिली असल्याचं किशनने सांगितलं.

दरम्यान, भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली असून उर्वरित सामने जिंकून श्रीलंकेला व्हाईवॉश देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आयुषमानच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल, पाहा फोटो!

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला आजोबांचा जीव; थरारक व्हिडीओ व्हायरल

‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

“तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More