बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तापसी आणि अनुराग कश्यप प्रकरणात आयकर विभागाच्या हाती लागले मोठे पुरावे

मुंबई | बॉलिवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नु यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.  आयकर विभागाने दोन फिल्म प्रोडक्शन कंपनी, दोन व्यवस्थापन कंपन्या आणि तापसी पन्नु या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी केली आहे. पुणे, मुंबई, हैद्राबाद आणि दिल्ली येथिल कार्यालय आणि घर अशा मिळुन एकुण 28 ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत.

आयकर विभागातील अधिकाऱ्यांना एकुण 350 कोटी रूपयांचा कर चुकवल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित कारवाई दरम्यान त्यांना कर चुकवल्याचे सबळ पुरावेही मिळत असल्याने आता तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

तापसी पन्नुच्या घरून अधिकाऱ्यांना 5 कोटी रूपयांच्या रोख व्यवहाराच्या पावत्या मिळाल्या आहेत आणि अनुराग कश्यपच्या चौकशी नंतर 20 कोटी रूपयांचे कर चुकवल्याचे पुरावे मिळाले आहेत. एकुण 350 कोटी रूपयांचा कर चुकवल्याचा संशय आयकर विभागातील अधिकाऱ्यांना आला आहे. त्यानुसार कडक चौकशीही सुरू आहे.

संबंधित प्रकरणावरून राजकिय प्रतिक्रियाही उमटत आहेत. देशात राजे आणि नवाबांची हुकूमशाही आहे आणि त्यांच्याविरोधात कोणी काही बोललं तर त्यांना तुरूंगात डांबलं जातं. अशाप्रकारची प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी दिली आहे. तसेच केंद्र सरकारवर टीका करताना महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाही वाचवणाऱ्या आणि केंद्रावर टीका करणाऱ्या लोेकांवर जाणीवपुर्वक छापेमारी करण्यात येत असल्याचं बोलुन दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द त्यांनी खरा करून दाखवला

वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; सावत्र बापाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

पोलीस असल्याचं सांगून ठेवले शारीरिक संबंध, चौकशी केल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपी मुदतीत हजर न झाल्यास…

गुडन्यूज, कोरोनाचं टेंशन कायमचं जाण्याची शक्यता; शास्त्रज्ञांनी लावला ‘हा’ महत्त्वाचा शोध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More