बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून शरद पवारांनी मोदींची भेट घेतली’; भेटीवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

सोलापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. मोदी आणि पवारांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली आहे.  अशातच शरद पवारांनी कोणत्या कारणामुळे भेट घेतली यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत. यासाठी शरद पवार मोदींना भेटायला गेले असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

पूर्वी नाबार्डचं बंधन या सर्व बँकांवर होतं. नाबार्डचं बंधन काढून केंद्राने आरबीआयचं बंधन घातलं आहे. देशात राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका नागरिकांना दाद देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये सहकार क्षेत्र भक्कमपणे उभं राहिलं. बँकांना आता निर्बंधांत आणण्यात आलं आहे आणि हे निर्बंध कमी करण्याच्या मागणीसाठी  शरद पवार गेले आहेत, असंही जयंत पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, पवारांनी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंत्री पीयूष गोयल यांनी पवारांची भेट घेतली. आज थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राचा विकास पुढे जात नसल्याने व्यथित झालेल्या पवारांना मोदींसोबत चर्चा करावी वाटली असेल”

“पवार तिथे शंका, तेव्हा 80 तासांचं सरकार बनलं, आता…”

राज ठाकरेंनंतर अमित ठाकरेही नाशकात दाखल; मोठी जबाबदारी देण्याची शक्यता

प्रविण दरेकरांनी राज ठाकरेंना दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले…

आपल्या हक्कासाठी राजकीय पक्षांबरोबर बंड करण्याची तयारी करा- विजय वडेट्टीवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More