बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काना मागून आला आणि तिखट झाला’; नाव न घेता जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई | एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवरही टीका केली आहे.

पक्षामध्ये खडसेंवर अन्याय झाला. त्यांनी मुंडेच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. एकनाथ खडसेंना त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत न्याय करेल असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.

भाजमध्ये खडसेंनी आपलं मोठं योगदान दिलं पण काना मागून आला आणि तिखट झाला असा टोला जयंत पाटील यांनी नाव न घेता फडणवीसांना लगावला आहे.

एकनाथ खडसेंनी विधीमंडळाचा सदस्य काय करु शकतो हे दाखवून दिलं. त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून ताकदही आम्ही पाहिली. खडसेंचा एक दिग्गज नेता मंत्री झाला, मात्र पहिल्या रांगेतील नेत्याला सभागृहातील मागच्या रांगेत बसवण्याचं काम भाजपमध्ये झालं. खडसेंवरील अन्यायावर सभागृहात सर्वात जास्त मीच बोललो, असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या उपस्थित एकनाथ खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश!

शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न; आव्हाड गृहनिर्माण मंत्रिपद सोडण्यास अनुत्सुक

पुण्यातील बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ!

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More