नागपूर | वारकऱ्यांच्या भावना दुखल्या असतील तर मी माफी मागतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारकऱ्यांची माफी मागितली आहे. संत तुकाराम महाराज यांचा खून झाला होता, असा दावा आव्हाड यांनी केला होता.
फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. आव्हाडांनी पुरेसे पुरावे सादर करावे, अथवा सगळ्या वारकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती.
दरम्यान, सत्य बोलणं हा जर गुन्हा असेल तर तो मी केला आहे, त्यासंदर्भात वारकऱ्यांची माफी मागतो, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही; रामराजेंच्या वक्तव्यानं हशा
-हिमा दासनं रचला इतिहास; पोरी, आम्हाला तुझा अभिमान वाटतो…!!!
-…तर मी इथेच विष घेऊन आत्महत्या करेन- सुनील तटकरे
-सहावीच्या पुस्तकात गुजराती मजकूर; विरोधकांचा मोठा गदारोळ
-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!