बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा गांधींविरोधात गरळ ओकणाऱ्या कालीचरणला अखेर अटक!

रायपूर | राष्ट्रपती महात्मा गांधी (Mahatma gandhi) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला (Kalicharan Maharaj) अखेर अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथीथ धर्मसंसदेत कालीचरण याने गांधीबद्दल शिवराळ भाषा वापरली होती. त्यानंतर रायपूर पोलिसांनी अखरे कालीचरण महाराजावर अटकेची कारवाई केली आहे.

मोहनदास करमचंद गांधींनी सत्यानाश केला. नथुराम गोडसे यांचं त्यांना मारल्याबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद. काही जखमांचे वेळीच ऑपरेशन नाही झालं तर पुढे त्याचा कॅन्सर होतो, असं वक्तव्य कालीचरणने महात्मा गांधीबद्दल बोलताना केलं होतं. याशिवाय त्याने महात्मा गांधीबद्दल काही आक्षेपार्ह शब्दही वापरले होते.

कालिचरणने भर धर्मसभेत व्यासपीठावर हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या भाषणाचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या. अनेक पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हेही दाखल झाले होते. कालीचरण  हा मुळचा अकोला येथील आहे.

दरम्यान, कालीचरणच्या या वक्तव्याचा अनेक भागातून निषेध करण्यात आला होता. काँग्रेसकडून विविध कालीचरणच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आली होती. एवढंच नाही तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही कालीचरण विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

थोडक्यात बातम्या-

“राज्य सरकारमधील नेत्यांना घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट पुरस्कार दिले पाहिजे”

नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाचा दिलासा नाहीच!

“भाजपला मत द्या आणि 200 रुपयांची दारू 50 रुपयांना न्या”

नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सलमानच्या वाढदिवसाला जेनेलियाचा तुफान डान्स; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More