Top News महाराष्ट्र मुंबई

कंगणा राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा!

मुंबई | मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावतवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यानंतर शिवसेना आणि कंगणा राणावत यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे. अशात केंद्र सरकार कंगणाच्या मदतीला धावून आलंय.

केंद्रीय गृहमंत्रालयानं कंगणा राणावतला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कंगणा राणावतने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे, असं ट्विट कंगणाने केलंय.

मी मुंबईत येतेय. हिंमत असेल तर अडवून दाखवा, अशा शब्दांत कंगणानं आव्हान दिल्यानंतर वातावरण तापल्याचं दिसून आलं. त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं कंगणाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मी सुशांत सरांना गांजाचं सेवन करताना पाहिलं होतं’; नोकर दीपेशचा खुलासा

अखेर ‘एमपीएससी’कडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

‘मला महाराष्ट्र आवडतो’; कंगणा राणावतचं मराठीत ट्विट

“छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणं हा महाराजांचा अपमान आहे”

सरकार देशातील सर्व पेट्रोल पंपावर लवकरच चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या विचारात…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या