बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करुणा शर्मांच्या अडचणींत वाढ, आणखी दोन दिवस रहावं लागणार कोठडीत

बीड | सामाजिक न्यायमंत्री धनंज मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला होता. अशातच आता जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अशातच आता त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

करुणा शर्मावर 18 स्पटेंबरला होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे. अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता अजून दोन दिवस करुणा शर्माला कोठडीतच रहावं लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

करुणा शर्माची 18 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र आता 20 सप्टेंबरला ही सुनावणी होणार असल्याचं अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओनं सोशल मीडियावर एकच खळबळ उडवली. आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

थो़डक्यात बातम्या – 

मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

पुढील दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा

सोनू सूदवर गंभीर आरोप; Income Tax च्या छापेमारीनंतर धक्कादायक माहिती समोर

“मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?”

“दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More