Loading...

रक्षाबंधनच्या निमित्ताने अरविंद केजरीवालांचं समस्त महिलावर्गाला मोठं गिफ्ट

नवी दिल्ली | दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या(डीटीसी) बसने येत्या 29 ऑक्टोबरपासून म्हणजेच भाऊबीजेपासून महिलांना नि:शुल्क प्रवास करता येईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल(गुरूवारी) रक्षाबंधनच्या मुहुर्तावर केली आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या 5 वर्षांच्या कार्यकाळातलं स्वातंत्र्यदिनाचं शेवटचं भाषण अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडिअमवर केलं. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

Loading...

रक्षाबंधनच्या मुहुर्तावर केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी भाऊबीजेपासून होणार असल्याने हे एका भावाकडून बहिणींसाठी गिफ्ट असल्याचं म्हणत या निर्णायाचं महिलांकडून विशेष स्वागत केलं जातंय.

दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्येही महिलांना नि:शुल्क प्रवास करता यावा, यासाठीही आम्ही प्रयत्न करतोय. त्या निर्णयावर आम्ही विचार विनिमय सुरू आहे, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-मी बिकाऊ नाही; मुलाला अटक केल्यानंतर भाजप खासदाराचं मोदींना ट्विट

-अंबानी झाले आणखी श्रीमंत; गेल्या दोन दिवसात संपत्तीत झाली ‘इतक्या’ कोटींची वाढ!

Loading...

-…म्हणून मी निवडणूक लढवणार नाही- अजित पवार

-अटल बिहारी वाजपेयींचा पहिला स्मृतिदिन; राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

-प्रत्येक रक्षाबंधनाला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते- धनंजय मुंडे

Loading...