बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, त्यामुळेच…”

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मागे मागील काही दिवसांपासून वादग्रस्त भोसरी भूखंड जमीन खरेदी प्रकरणाचा ससेमिरा आहे. याच प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांचा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर खडसेंनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

एकेकाळचे भाजपचे दिग्गज नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांची गनना होत होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे एकनाथ खडसे यांचा पत्ता कट झाल्याचं सांगितलं जातं. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांवर कडाडून टीका केली होती. अशातच आता एकनाथ खडसे पुन्हा भाजपवर टीकास्त्र चढवलं आहे.

मी 40 वर्ष भाजप रूजवण्याचा प्रयत्न केला. मात्र चाळीस वर्ष माझी अवहेलनाच केली गेली. इतक्या वर्षात गिरीश महाजन हे त्यांच्या मतदार संघात जाऊ शकले नाहीत. नाथाभाऊंना कोणीतरी स्पर्धक म्हणून गिरीश महाजनांना उभं केलं जातंय, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

महाजनांना आतापर्यंत मीच मदत करत आलोय. ते सरपंच होते, तेव्हापासून मीच त्यांना मदत करत आलोय. नाथाभाऊ मोठे होत आहेत. नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी गिरिश महाजन यांना मोठं केलं, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

गुटखा तस्करीत सापडला शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल

शरद पवार-अनिल परब बैठकीत नेमकं काय झालं; आली ‘ही’ माहिती समोर

“भरतासारख्या भावावर फक्त रामच प्रेम करू शकतात, आपण ते करू शकत नाही”

पार्थ पवार पुन्हा मावळातून निवडणूक लढवणार का?; ट्विटमुळे चर्चांना उधाण

अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, भाजपने निवडणुकीत दिला काँग्रेसला हात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More