बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी ‘या’ खेळाडूची निवड

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट (Indian Cricket) सध्या परिवर्तनाच्या फेरीतून प्रवास करत आहे. संघामध्ये नेतृत्व बदलाचं वारं वाहायला लागलं आहे. पण या नेतृत्व बदलाच्या वाऱ्यानं वादाला सुरूवात केली आहे. अशातच आता भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी नव्या उपकर्णधाराची नियुक्ती बीसीसीआयकडून (BCCI) करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून क्रिकेटच्या तीन्ही प्रकारामध्ये सातत्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या केएल राहुलची (KL Rahul) नियुक्ती भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राहुलकडं ट्वेंटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएलकडं उपकर्णधारपद असेल.

रोहित शर्माला दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. अशातच सर्वांना उपकर्णधार कोण असेल ही उत्सुकता होती. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा देखील उपकर्णधारपदाचा शर्यतीत होता. पण भविष्यातील तिन्ही क्रिकेट प्रकाराच्या नेतृत्वाचा विचार करत राहुल सरस ठरला अशी चर्चा आहे.

दरम्यान, बीसीआयकडून भारतीय संघात सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल काहीही सांगितलं गेलं नाही. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये विरोट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा आहे. अशात बीसीसीआयनं राहुलचा पर्याय स्विकारला आहे.

थोडक्यात बातम्या 

कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध पेटलं; पिल्लाला मारल्यानंतर ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250 कुत्र्यांना संपवलं

सहकार चळवळ मागे का पडली?, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?- अमित शहा

“अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, त्यांना तर…”

‘शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत अनिल परब की उद्धव ठाकरे?’; रामदास कदम आक्रमक

“लग्नाला उशीर केल्यास मुली पाॅर्न पाहत बसतील, त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More