बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोल्हापूरचा गडी बिनविरोध जिंकला! पाटील यांचा मार्ग मोकळा

मुंबई | राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. राज्याच्या वरिष्ठ सभागृहातील रिक्त जागांसाठी अनेक ठिकाणी तुल्यबळ लढती अपेक्षित आहेत. अशातच अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातील एका जागेसाठी राज्याचे मंत्री सतेज पाटील (Satej patil) आणि भाजप नेते अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्यात सामना होता.

गत काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुका बिनविरोध घेण्यात आल्यानं आता या विधानपरिषदेच्या निवडणुका सुद्धा बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न चालू होते. अशातच सर्वात जास्त लक्ष असलेली कोल्हापूरची जागा आता बिनविरोध निवडली जाणार आहे. परिणामी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे बिनविरोध आमदार होणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (CHANDRAKANT PATIL) हे दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीसाठी गेल्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की होतं. अशातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील अमित शहांच्या भेटीला गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. गृहमंत्री अमित शहांनी या दोन्ही नेत्यांसोबत प्रदिर्घ चर्चा केली आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या मातीत यावेळी तुल्यबळ लढत होण्याची अपेक्षा होती. पण भाजप नेतृत्वानं ही जागा बिनविरोध काॅंग्रेसच्या पारड्यात टाकल्यानं पाटील यांना काही मेहनत घ्यायची गरज पडली नाही.

थोडक्यात बातम्या

“…मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?”, राऊतांचा खोचक सवाल

लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळले जोडप्याचे मृतदेह अन् उडाली खळबळ

“…तर त्याला बाॅक्सिंग रिंगमध्ये घेऊन चांगलाच झोडपला असता”

विलिनीकरण मान्य झालं नाही तर काय?, अनिल परब म्हणतात…

“…तर आपण संविधानाचं एक पानही आज लिहू शकलो असतो का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More