तिघांनाही समाजापुढे फाशी द्या; कोपर्डीच्या निर्भयाच्या आईची मागणी

अहमदनगर | तिन्ही दोषींना सगळ्या समाजापुढे जाहीर फाशी द्या, अशी मागणी कोपर्डीच्या निर्भयाच्या आईने केलीय. आज न्यायालयातील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर त्या बोलत होत्या. 

आमची बायको, आई, मुलं आमच्यावर अवलंबून आहेत, असं हे मारेकरी न्यायालयात सांगत आहेत. माझ्या छकुलीला आई नव्हती का? वडिल नव्हते का? त्यांना हे का दिसलं नाही?, असा सवाल विचारताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

तसेच समाजापुढे या सगळ्यांना जाहीर फाशी व्हायला हवी, त्यांच्यावर कुत्रे सोडायला हवेत म्हणजे लहान लहान मुलींवर अशाप्रकारचं कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, असंही त्या म्हणाल्या.