बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी दरवाढ; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय बाजारात बदल झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर हा गेल्या सत्रात 40 हजार 241 रुपये प्रति तोळा एवढा होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्यामुळे भारतीय बाजारावरही त्याचा परिणाम थेट दिसून आला.

गुरुवारी सोन्याच्या किंमतीमध्ये तब्बल 439 रुपये प्रतितोळा वाढ झाली आहे. त्यानुसार, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 46 हजार 680 रुपये प्रति तोळा एवढी झाली आहे. चांदीच्या दरामध्ये वाढ होऊन आता चांदी 70 हजार रुपये प्रति किलो झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

चांदी यापूर्वी 68 हजार 209 रुपये प्रति किलो दरावर मार्केट बंद झालं होतं. परंतु, त्यामध्ये आता वाढ झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. त्यानुसार, चांदीमध्ये जवळपास 1300 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सोन्याने गाठलेल्या उच्चांकापासून आजची किंमत ही 9 हजार रुपयांनी कमीच असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मागच्यावर्षी कोरोनाच्या संकटामध्ये भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीने सर्वोच्च उच्चांक गाठला होता आणि त्यानंतर हळूहळू सोन्याच्या किमती कमी होत गेल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या सुधारणांमुळे त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेत पडून सोन्याच्या किमती खाली-वर होत असताना पाहायला मिळतात.

थोडक्यात बातम्या –

“अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, वेड पांघरून पेडगावला जात आहे”

मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याकडून ‘ही’ खुशखबर

मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

कोरोना रोखण्यासाठी आता एकमेव पर्याय; राहुल गांधींच्या ‘या’ मागणीने धरला जोर

मुंबई विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्सची इमर्जन्सी लँडिंग; पाहा व्हिडीओ

…अन् लातुरात चक्क मृतदेहांची अदलाबदल; एकाच मृतदेहावर दोन वेळा अंत्यसंस्कार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More