Top News

फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन लागू!

लंडन | इंग्लंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करत सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

यूकेमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 1 मिलियन होताच पीएम जॉनसन यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली.  हा लॉकडाऊन गुरुवारी सुरु होईल आणि 2 डिसेंबरपर्यंत लागू असेल, असं जॉनसन यांनी सांगितलंय.

कोणताही जबाबदार पंतप्रधान कोरोनाच्या गंभीर आकडेवारीकडे दुर्लक्ष करु शकत नाही. यापूर्वीच लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारो लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. त्यापैकी काहींची अवस्था गंभीर आहे. आपला देश अजून मृत्यू पाहू शकत नाही, असं जॉनसन म्हणालेत.

अनावश्यक दुकाने बंद राहतील, व्यायामासारख्या आणखी काही आवश्यक कामांसाठीच लोक घराबाहेर पडू शकतील, असं जॉनसन यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा”

नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे- रतन टाटा

“निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये”

“महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही”

“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या