नागपूर महाराष्ट्र

…तर मी उद्धव ठाकरेंचे पाय धरायला जाईन- महादेव जानकर

नागपूर | शिवसेना-भाजप एकत्र राहावेत अशी रासपची भूमिका आहे, त्यामुळे गरज पडली तर युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचे पाय धरायला जाईन, असं रासप नेते आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलंय. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आम्हा भावाभावांमध्ये किती भांडणं झाली तरी आमची मतं दुसऱ्याच्या पारड्यात टाकणार नाही, ती आमच्याच आढीत कशी पडतील ते पाहू, असं जानकर म्हणाले.

दरम्यान, शिवसेना, भाजप, आरपीआय शिवसंग्राम, शेतकरी संघटना, रासप एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करु. मी विनंती करेन, पाय धरेन. कारण मी सगळ्यांपेक्षा छोटा आहे, असं महादेव जानकर म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-गोपाळ शेट्टी पक्षावर नाराज? खासदारकीचा राजीनामा देणार???

-मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…

-मला माफ करा; अभिनेता रितेश देशमुखची जाहीर माफी

-रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन; रितेश देशमुखवर टीकेची झोड

-काल आक्रमक असलेेले मुख्यमंत्री आज मात्र बॅकफूटवर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या