बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधानांच्या कानापर्यंत ‘महाराष्ट्र बंद’चा आवाज पोहोचवणार”

पुणे | देशभरातून लखीमपूर घटनेचा विरोधी पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. लखीमपूर येथील मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराने केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ठाकरे सरकारने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.

ठाकरे सरकारच्या महाराष्ट्र बंदच्या घोषनेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात कलगीतूरा रंगला आहे. विरोधी पक्ष भाजपाने राज्य सरकार मुद्दाम असं करत असल्याचं म्हटलं आहे. याला उत्तर देताना पुणे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोधी पक्ष भाजपला चांगलंच घेरलं आहे.

देशातील सर्व शेतकरी बांधवांना केंद्र सरकार त्रास देत आहे. लखीमपूर घटना, शेतकरी आंदोलन यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नातेवाईकांना त्रास  देण्याचं काम केंद्र सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून करत आहे. महाराष्ट्र बंदचा आवाज पंतप्रधानांच्या कानापर्यंत पोहचवणार, असंही जगताप म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदच्या नियोजनाबद्दल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. रिक्षा पंचायत, लोकायत यांसारख्या समविचारी संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला असल्याचं जगताप यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही”

सर्वोच्च न्यायालयाने केली लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात

एनसीबीनंतर आता डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईतून जप्त केले 25 किलो ड्रग्ज

“पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, मलाही ईडीची नोटीस पाठवली होती…”

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 2 लाख नव्हे तर ‘इतक्या’ लाखांपर्यंत करता येतील व्यवहार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More