बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

उस्मानाबाद | राज्यात तीन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल, असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार संजय राठोड यांनी केला आहे. उस्मानाबादमध्ये बंजारा समाजाचा मेळाव्यात राठोड बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना वाटेल तोपर्यंतच सरकार टिकेल. जोपर्यंत सरकार चालवायचं आहे तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवतील. त्यानंतर पुढचा निर्णय ते घेतील. तसेच सरकार टिकवायचं आहे की नाही ते पुर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे, असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

राठोड पुढं बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम अत्यंत चांगलं असून त्यांचं देशभरातून उत्कृष्ठ कामाबद्दल कौतूक झालेलं आहे. राज्यातील लोकांना शिवसेनेचं काम आवडलं आहे. तसेच राज्यातील जनतेला भाजपचं सरकार हवं आहे, या भाजपचा दाव्यात तथ्य नाही म्हणत, राठोड यांनी भाजपचा दावा खोडून काढला आहे.

दरम्यान, राजकारणात कोणत्याही पक्षात कार्यकर्ता बनण्यास अनेक वर्षाचा कालावधी जातो. मला 30 वर्षाचा कालावधी लागला. मला लोकांनी 4 वेळेस निवडून दिलं आहे, असं राठोड यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत”

“केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये”

“अजूनही मनुवादी जिवंत असल्यानं ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय’”

“भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार”

गेली 70 वर्षे ‘या’ मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाची सत्ता येते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More