बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंनी वापरलेली आणखी एक महागडी गाडी जप्त, ‘या’ कारणामुळे ही गाडी महत्त्वाची?

मुंबई | मनसुख हिरेन प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी वापरलेली आणखी एक महागडी गाडी एटीएसनं ताब्यात घेतली आहे. दमणमधून ही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

सचिन वाझे यांच्या बिझनेस पार्टनरची ही गाडी असल्याची माहिती आहे. दमणहून ही गाडी मुंबईत आणण्यात आली असून फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने या गाडीची तपासणी केली जात आहे. या गाडीचा गुन्ह्यात सहभाग होता का हे तपासलं जाणार आहे, त्यासाठी फॉरेन्सिक टीम या गाडीत काही पुरावे मिळतात का हे पाहात आहे.

मनसुख हिरेन यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत फेकून देण्यात आल्याची शक्यता आहे. गाडीतच त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह खाडीत फेकून दिल्याचा संशय आहे, त्यामुळे असं झालं असेल तर त्यात कोणती गाडी वापरण्यात आली यावर तपास सुरु असल्याचं कळतंय, त्यामुळे या गाडीची भूमिका या तपासात महत्त्वाची मानली जात आहे.

मुंबईतून ही कार दमणला नेऊन ठेवण्यात आली होती, त्यामुळे या कारवर संशय व्यक्त केला जात आहे. फॉरेन्सिकच्या टीमला प्रथमदर्शनी या गाडीत काही बॅग्ज मिळाल्या आहेत. या बॅगमध्ये काही कपडे फॉरेन्सिक टीमला मिळून आले आहेत, आता या सर्व गोष्टीची तपासणी होत आहे. एटीएस ही गाडी एनआयएच्या ताब्यात देण्याची शक्यता देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी क्षमा मागितली!

“स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली; फडणवीसांनी दाखवला पुरावा!

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More